पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
ध्येय व उद्दिष्टे
दृष्टी
- विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास साधून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक आणि जीवनकौशल्ये विकसित करणे.
- जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यास सक्षम बनवून स्थानिक व राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना समर्थ करणे.
ध्येय
- भेदभाव न करता सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
- मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
- आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित विद्यार्थ्यांची उन्नती साधणे.
प्रमुख उद्दिष्टे
- ग्रामीण विद्यार्थ्यांना, विशेषतः वंचित मुलींना, दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण देणे.
- अध्यापन व अध्ययन आनंददायी, सहयोगी आणि सहभागात्मक बनवणे.
- मूल्याधिष्ठित शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे.
- NSS व सहशैक्षणिक उपक्रमांद्वारे पर्यावरण जागृती निर्माण करणे.
- स्वयंशिस्त, न्यायबुद्धी, जबाबदारी आणि स्वतंत्र अध्ययनाची कौशल्ये विकसित करणे.