पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
मुख्य मजकुराकडे जा|
विद्या विनयेन शोभतेकुकडी एज्युकेशन सोसायटीपिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
कर्मयोगी स्व. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील
संस्थापककर्मयोगी स्व. कुंडलिकराव
रामराव जगताप पाटील
संस्था स्थापना — १९८२
कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.संपर्क व चौकशी →
ताज्या घडामोडी

संस्थेविषयी

कुकडी एज्युकेशन सोसायटी

कर्मयोगी स्व. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून कुकडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1982 मध्ये पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून संस्थेची निर्मिती करण्यात आली.

ग्रामीण विद्यार्थ्यांना, विशेषतः वंचित मुलींना, उच्च दर्जाचे व परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माध्यमिक, उच्च आणि तांत्रिक शिक्षण देणाऱ्या पाचपेक्षा अधिक शैक्षणिक घटकांमधून संस्था कार्यरत आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे ही संस्थेच्या कार्याची दिशा आहे. KG ते PG शिक्षण एकाच शैक्षणिक परिवारातून उपलब्ध करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

संस्थेचे नेतृत्व

  • संस्थापक: कर्मयोगी स्व. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील
  • सचिव: मा. राहुलदादा कुंडलिकराव जगताप पाटील